
पुणे : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या व्यवसायावर छापा टाकत सात महिलांची सुटका केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.
शुभांकर रमेश जवाजीवार आणि रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील वाकड भागातील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने डांगे चौकातील ‘एलिमेंट्स द फॅमिली स्पा’ सेंटरवर छापा टाकला. त्यात त्यांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला असून त्यांनी ७ महिलांची सुटका केली.
आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून या महिलांना व्यवसायात सहभागी केले होते.महिलांना त्यांच्या घरी आणि सामाजिक संस्थेकडे सोपवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पिंपरी चिंचवड येथे या प्रकारच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्या विरोधात पोलिसांनी कारवाई सत्र सुरु केले आहे.