पुणे : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या सरकारने राज्यात अनेक योजना राबवल्या आहेत. अनेक विकास कामे या सरकारमार्फत करण्यात आलेली आहेत. आता या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ हे अभियान राबवला जाणार आहे. या अभियानाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पुढील एक महिनाभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आतापर्यंत खाजगी आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांची माहिती रेल्वेच्या डब्यांवर दिली जात होती. त्याच डब्याचा वापर करून जाहिरातीद्वारे राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. त्यासाठी पुणेमार्गे धावणाऱ्या कोयना एक्सप्रेस, लातूर एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस आणि दादर-सावंतवाडी एक्सप्रेसवर जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत.
शिक्षण,शेती,आरोग्य, पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन, क्रीडा, रोजगार निर्मिती, सामाजिक, सांस्कृतिक वारसा आणि उद्योग या क्षेत्रात राज्य सरकारचे विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाचा एसटी महामंडळाच्या बसचा वापर केला होता. प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकार जनतेपर्यंत योजनांची माहिती देणार आहे