बारामती : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुका येत्या २१ डिसेंबर रोजी होणार आहेत. तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
१ ते ७ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
अर्ज भरण्यास १ डिसेंबरपासून सुरुवात होणार असली तरी ४ व ५ डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिध्द करण्याचा दिनांक २९ डिसेंबर असून अवघ्या पाच दिवसात ही प्रक्रिया सुरू होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची पाळापळ सुरू झाली आहे.