Site icon Aapli Baramati News

रखडलेल्या शिष्यवृत्तीसाठी अभाविप काढणार मोर्चा; राज्यातील ‘इतके’ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. महाराष्ट्र राज्यातील एकूण ५ लाख ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. शिष्यवृत्तीची रक्कम एकूण सहा हजार कोटीच्या घरात गेलेली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून ३१ डिसेंबर रोजी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

एससी, एसबीसी, ओबीसी, एनटी, ईबीसी, व्ही. जे. एन.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार शैक्षणिक शुल्कात अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.  शैक्षणिक शुल्कात कपात झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अल्पदरात शिक्षण घेता येते. या शिष्यवृत्तीचे वितरण राज्य शासनाकडून गेली चार वर्ष झाले नाही. रखडलेल्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळावेत या मागणीसाठी अभाविपने या मोर्चाचे आयोजन केले आहे.

मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. तर समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version