Site icon Aapli Baramati News

म्हाडा भरती परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात म्हाडाच्या ५६७ जागांसाठी १२ डिसेंबर रोजी परीक्षा होणार होत्या. मात्र परीक्षेच्या अगोदरच विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याच्या तक्रारी केल्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार म्हाडाने या परीक्षांची तारीख निश्चित केली असून दि. ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षा होणार आहेत.

म्हाडाने नुकतेच भरती परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाईन पद्धतीने ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीएसआयची मुख्य परीक्षा याच दिवशी होणार होती. दोन पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. म्हाडाच्या हे लक्षात येताच म्हाडाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

नवीन  प्रसिद्धीपत्रकात वेळापत्रकाची त्यांनी माहिती दिली.  त्यानुसार  २९ व ३० जानेवारी रोजी होणारी परीक्षा आत्ता नवीन वेळापत्रकानुसार ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी  ४ ते ६ या वेळात परीक्षा घेण्यात येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षा कधी होतात याबद्दल उमेदवारांमध्ये उत्सुकता होती. अखेर म्हाडाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version