Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे. २००८ साली झालेल्या एका प्रकरणात जामीन मिळून सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांना २००८ साली मुंबईत अटक झाली होती. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ  बसेसवर दगडफेक, जाळपोळ केली होती.  राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्ताविरोधात जमावबंदीचे उल्लंघन,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कलम १४४, कलम ४२७, कलम ३३६, आणि कलम १०९ नुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज ठाकरे यांच्यासोबत सर्व आरोपींना त्यावेळी जामीन मिळाला होता. पण राज ठाकरे सुनावणीसाठी उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.परळी वैजनाथ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अटक वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version