Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसणाऱ्या किरीट सोमय्यांच्या चौकशीचे आदेश

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. मंत्रालयात नगरविकास खात्यातील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून ते फाईल चेक करत असल्याचे या फोटोत दिसत आहे. त्यामुळे वाद सुरू झाला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून काही फाईल्स पाहिल्याचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना दिले आहेत. 

या संपूर्ण प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयात जाऊन मी कोणतेही गोपनीयतेचा भंग केला नाही. फाईल तपासून मी कोणतीही चूक केली नाही. माहिती अधिकाराच्या माध्यमातून मी फाईल बघितल्या असून घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली आहे. सरकारला  नेमकी भीती कशाची आहे,कोणत्या फाईल तपासल्या याची भीती आहे का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version