आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी : मान आणि मणक्याच्या त्रासामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी त्यांना मुंबईतील रिलायन्स ग्रूपच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे.     

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेसह मणक्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे ते उपचारासाठी बुधवारी संध्याकाळी रूग्णालयात दाखल झाले. पुढील दोन ते तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत, उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीवेळी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवायला लागला होता.गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे  क्षणभराचीही उसंत मिळाली नाही.त्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. जनतेच्या आशीर्वादाने माझी तब्येत लवकरच बरी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे कोरोना विषाणूची लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे. राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मान वर करायलाही वेळ मिळत नव्हता. त्यातूनच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटले तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.

Press the Bell icon and Connect with Aapli Baramati News

कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us