Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी ! नवाब मलिक यांच्या खात्यासंदर्भात ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांतर्गत येणार्‍या वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच अधिकाऱ्यांकडून छापेमारी चालू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून पुण्यातील कोणत्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांतर्गत वक्फ बोर्ड येते. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत विविध गौप्यस्फोट करत आहेत. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून नवाब मालिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यानंतर काही तासातच नवाब मलिक यांच्या विभागाअंतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीकडून पुण्यात सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

यापूर्वी  पुणे पोलिसांकडून व बोर्ड जमीन प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. जमीन गैरव्यवहारप्रकरणी ७कोटी ७६ लाख रुपयांचा  घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या जमीन गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांकडे असलेला हा तपास ईडीने आता आपल्या अखत्यारीत घेतला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version