Site icon Aapli Baramati News

अन् नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मी फोन करतोय; पण ते घेत नाहीत..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून,  त्यांना काही दिवसापूर्वी  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सध्या आराम करत आहेत. त्यांच्या तब्येतीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘मुख्यमंत्र्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दररोज फोन करत आहे. मात्र ते फोन घेत नाहीत’ असा गौप्यस्फोटच केला आहे.

पुणे दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली. मी तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दररोज फोन करत आहे. मात्र मुख्यमंत्री माझा फोन घेत नाहीत. परंतु शिवसेनेतील अनेक  नेतेमंडळींशी ओळख आहे. मी त्यांच्याकडेही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. सभागृहात कधीकधी संजय राऊत भेटत असतात. त्यांना मी तुमच्या साहेबांची तब्येत कशी आहे ? असं विचारत असतो. आमच्या साहेबांची तब्येत ठीक आहे, असे उत्तर संजय राऊत उत्तर देत असतात, असे  नारायण राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानदुखीच्या त्रासामुळे नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेक दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र त्यांना डॉक्टरांकडून सक्तीची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने बैठकांना हजेरी लावून आपले नियमित कामकाज करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version