नाशिक : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षाच्या वर्षपूर्तीवर सरकरच्या कामावर अनेक जण खुश आहेत तर; काहीजण नाराज आहेत. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आपण २० वर्ष मागे गेले आहोत, असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रवीण पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांच्या सरकारने भ्रष्टाचाराचा एकही डाग लावून न घेता काम केलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपांचे डाग लागले आहेत. महाविकास सरकारच्या कामामुळे राज्य २० वर्षे मागे गेले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यात चालू केलेल्या मोठ्या प्रकल्पांची कामे ठप्प झाली आहेत. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. राज्य सरकार गुन्हेगारांच्या बाबतीत देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेले. सरकारच्या आशीर्वादाने भाजप मंडलाचा अध्यक्षाची खुलेआम हत्या करण्यात आली. आता नाशिकरांना नाशिकनगरी गुन्हेगारीचे क्षेत्र होते का काय ? अशी भीती वाटत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.