Site icon Aapli Baramati News

महाविकास आघाडी सरकारचा राज्यपालांना दे धक्का; ‘हे’ अधिकार घेतले काढून

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदाराची नियुक्तीचा निर्णय राखून ठेवल्याने राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष सुरूच आहे. अशातच पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपालांचे सबंध चांगले नसल्याचे  दिसून आले आहे.  राज्य सरकारने राज्यपालांचे विद्यापीठांचे  कुलगुरू नेमण्याचे आधिकार काढून घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रकुलपतीपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६  मध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे,  राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावणे, त्यांचे बळकटीकरण, गुणवत्ता वाढविण्याच्या हेतूने अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार अधिनियमात बदल केले जाणार आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये नव्याने कलम ९ (अ) समाविष्ट करून प्रकुलपतीपदाची तरतुद करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री हे पदसिद्ध प्रकुलपती  असतील. तसेच कुलगुरूंच्या नेमणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये सुधारणा करून पाच सदस्यांची राज्य सरकारकडे करेल. त्या पाच सदस्यांपैकी कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी दोन नावांची शिफारस राज्य सरकारकमार्फत कुलपतींकडे करेल.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version