मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखिमपुर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. या बंदला बेकायदेशीर म्हणत मुंबईतील एका वकिलाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र पाठवले आहे. या बंदची सुमोटो दखल घ्यावी असे त्या वकिलांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका वकिलाने उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजचा बंद हा बेकायदेशीर आहे. हा बंद अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आडवा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंदची उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घ्यावी, अशी विनंती त्या वकिलाने पत्रात केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषित केलेल्या बंद वर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी या वकिलाने केली आहे.
महाराष्ट्रातील लोक आत्ताच लॉकडाऊनमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे बंद त्यांना त्रासदायक ठरू शकतात. राज्य सरकारने पुकारलेला हा बंद, अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षाने पुकारला आहे, असे समजले जाऊ शकते. असेही त्या वकिलाने या पत्रात म्हटले आहे.