आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रराजकारण

मला त्यांनी ईडीची नोटीस दिली, महाराष्ट्राने भाजपला वेडी ठरवलं : शरद पवार यांचा खोचक टोला

महानगरे
ह्याचा प्रसार करा

सोलापूर : प्रतिनिधी  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सरकारने पाहुणे पाठवल्याचं मला कळलं. मात्र पाहुण्याची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधी मलाही एका बँकेच्या प्रकरणाबाबत नोटिस आली होती. मी त्या बँकेचा सदस्यही नव्हतो. मी बँकेकडून कर्ज देखील घेतलेले नव्हते. तरीसुद्धा मला नोटीस बजावण्यात आली. त्यावेळी लोकांनी भाजपला वेडी ठरवलं होतं असा खोचक टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला. अजित पवार यांच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत काही गोष्टी केल्या असतील. तर त्याचा संताप सर्वसामान्य जनतेतून दिसून येईल. भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. मात्र त्यांना जनता धडा शिकवेल, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधितांवर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीचे राज्यात चांगले पडसाद उमटले आहेत . या प्रकरणावर सत्ताधारी पक्षात भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सोलापूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. अजित पवारांकडे सरकारने पाहुणे पाठवले होते. पाहुण्यांची आपल्याला चिंता नसते असा टोला त्यांनी लगावला.

मलाही नाहक ईडीकडून नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने भाजपला वेडी ठरवले. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता जनताच आपला संताप दाखवून देईल, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

देश पारतंत्र्यात होता. त्यामुळे देशाचा विकास नव्हता. नेहरूंनी विकासाचा पाया रचला. मात्र आज केंद्र सरकार रेल्वे,  विमानतळ, बंदरे यासारख्या सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण करत आहे. या सगळ्या गोष्टी केंद्र सरकार व्यापाऱ्यांना देत आहे. वाढत्या इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली आहे, अशा अनेक मुद्द्यांवर पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us