Site icon Aapli Baramati News

मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवण्याची गरज : अशोक चव्हाण

ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मी मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी झुकते माप ठेवले आहे आणि या पुढेही असेल. मराठवाड्याच्या  सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी  एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी आपापल्या पक्षाची भूमिका बाजूला ठेवायला हवी, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

बांधकाम खात्यामार्फत कुंभेफळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व भव्य लोकार्पण कार्यक्रमाचा सोहळा झाला. बांधकाम खात्यामार्फत पाच कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे काम करण्यात आले. त्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या स्थानिक निधीतून विविध  विकास कामांचे भूमिपूजन त्यासोबत ग्रामपंचायतीचे विविध कामांचे भूमिपूजन या लोकार्पण सोहळ्यात संयुक्तपणे करण्यात आले. या झालेल्या भव्य कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी  उद्धव ठाकरे यांच्यासारखे महान दृष्टिकोण असणारे मुख्यमंत्री लाभल्याचे गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडी सरकार ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या  लोकार्पण सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ बागडे होते. यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे,  जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा शेळके, माजी आमदार  डॉ.कल्याणराव काळे, नामदेव पवार, सुभाष झांबड, कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे,  बाजार समिती सभापती जगन्नाथ काळे, वाकुळणी देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . निलेश गटणे आदी मान्यवर उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version