
NIA च्या चार्जशीटमध्ये चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न परमवीरसिंग यांनी केल्याचा स्पष्ट उल्लेख…
मुंबई : प्रतिनिधी
तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमवीरसिंग यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमवीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमवीरसिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
पहा काय म्हणाले नवाब मलिक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=212883737562785&id=107551028096057
मात्र आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत हे एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.