
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होताना दिसत आहे. अशातच, त्यांचा जागतिक पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा प्रंतप्रधान देखील त्यांचाच होऊ शकतो असेही ते सांगू शकतात. व्हाईट हाऊसमध्ये आमचा पंतप्रधान असेल असेही ते सांगू शकतात” अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.
संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ही टीका केली आहे. राऊत म्हणाले, भाजपने स्वतः अंधाऱ्या विहिरीत उडी मारलेली आहे. जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात. त्यांच्या नशिबी शेवटी निराशाच असते. त्यांचा जागतिक पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचाच असेल असेही ते सांगू शकतात. व्हाइट हाउसमध्ये देखील आमचा पंतप्रधान असेल, असेही ते सांगू शकतात. मात्र काही झाले तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये पुढे २५ ते ३० वर्ष त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजपा राहील की नाही मला माहिती नाही. २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. तेव्हाही दिल्लीतले चित्र बदललेले असेल. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र विसरून जावा. ते ७५ ते १०० जागा जिंकतील. आणखी काही करतील. मात्र महाविकास आघाडीच महाराष्ट्राचे भवितव्य आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.