Site icon Aapli Baramati News

ब्रेकिंग : खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार हे आता सांगली जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीत पत्रकारांशी बोलताना कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज सकाळी ९ वाजता ना. पवार हे कोल्हापूर येथील विमानतळावर येणार होते.  सव्वा नऊ वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करून शासकीय विश्रामगृहात पूरस्थितीचा आढावा घेणार होते.

या आढावा बैठकीनंतर शिरोळ येथील पूरग्रस्त भागांची पाहणी करून ते पलूसला जाणार होते. साताऱ्यातून कोल्हापूरकडे रवाना होण्यापूर्वीच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर दौरा रद्द करून अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. ही पाहणी करून ते सांगलीत बैठक घेणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version