आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्र

बेकायदेशीररित्या दारू विक्रीप्रकरणी दौंडमध्ये एकावर गुन्हा दाखल

पुणे
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अरविंद विठ्ठल पवार असे या आरोपीचे नाव असून कारवाईची चाहूल लागताच त्याने पळ काढला.

दौंड तालुक्यातील काळेवाडी चौकाजवळ अरविंद पवार हा दारू विक्री करण्याचा परवाना नसताना देशी व विदेशी दारू विकत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दौंड पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये  ४ हजार २४० रुपये किमतीची देशी विदेशी दारू  जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९  चे कलम ६५(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलिस करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us