
मुंबई : प्रतिनिधी
हिंदी मालिकांप्रमाणेच मराठी मालिकाही अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. इतकेच नव्हे तर या मालिकेतील कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अरुंधतीचा मायाळू आणि सर्वात जास्त समजदार पणाने अनेक चाहत्यांना वेडं केलं आहे.
सध्या अरूंधतीचा आणि संजनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होणाऱ्या या मीम्समध्ये संजना रडताना दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोत ‘बाई दोन थोबाडीत मार पण प्रवचन देऊ नकोस असे लिहिण्यात आले आहे. तसेच अरुंधतीचाही फोटो आहे. त्यावर ‘घटस्फोट घेऊन चार चारदा घरी परत येणारी माणसं आहोत आम्ही’ असे लिहिण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर या मीम्स प्रचंड राडा करत आहे. नुकतेच मालिकेत संजनाने अनिरुद्ध सोबत लग्न केले आहे. परंतु, तिचे या कुटुंबातील लोकांशी फारसे चांगले जमत नसल्याचे दिसत आहे. सतत वाद सुरू असल्याने घरातील सर्वच व्यक्ती नाराज असल्याचे दिसून येते आहे. आता ही मालिका खूप रंजक वळणावर आली आहे. नुकतीच अरूंधती गौरीच्या घरी राहिला आल्याने पुढे काय होणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरत आहे.