Site icon Aapli Baramati News

पुण्यातील निर्बंध शिथिल होणार..? अजितदादांच्या आजच्या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने निर्बंध शिथिल करत रात्री ८ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पुण्याला यातून दिलासा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत पुण्यातील निर्बंधांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केलेत. मात्र ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात निर्बंध कायम असतानाही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या आणि त्या अनुषंगाने चर्चा होवून निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानेही पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी लावू धरलेली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याचीच सर्वांना उत्सुकता आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version