आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना संतापजनक; आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पुणे
ह्याचा प्रसार करा

  • पोलिसांकडून आरोपींना तातडीने अटक, उर्वरीत अटकेची कारवाई युद्धपातळीवर
  • आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल
  • रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार

मुंबई : प्रतिनिधी

पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण..?

पीडित १३ वर्षीय मुलगी ही ३१ ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

रविवारी दि. ५ सप्टेंबर सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us