पुणे : प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील उरुळीकांचन येथे भर चौकात असलेल्या हॉटेल सोनाईसमोर राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष जगताप आणि त्यांच्या साथीदारांवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये संतोष जगताप यांच्यासह अंगरक्षकही ठार झाला आहे.
मात्र संतोष जगताप यांनी हा हल्ला होत असताना प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात समोरील एक हल्लेखोर ठार झाला आहे. स्वागत बापू खैरे असे या मृत हल्लेखोराचे नाव असून तो उरुळी येथीलच असल्याची माहिती पुढे आली आहे.
शुक्रवारी दुपारी संतोष जगताप हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत हॉटेल सोनाईसमोर थांबले असताना हा हल्ला झाला. त्यामध्ये संबधित हल्लेखोरांनी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांवर वार करत गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. या हल्ल्यात संतोष जगताप यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकाचाही मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यादरम्यान, संतोष जगताप यांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. स्वागत खैरे असे त्याचे नाव असून आप्पा लोंढे यांच्या खूनातही त्याचा सहभाग होता, अशी माहिती समोर येत आहे.