मुंबई : प्रतिनिधी
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या ४ हजार २२२ घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी २०२२-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.