Site icon Aapli Baramati News

पुणे पालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात आणण्यासाठी कामाला लागा : संजय राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यात महाविकास आघाडी सरकार यशस्वीरीत्या काम करत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकाही महाविकास आघाडीच्याच ताब्यात यायला हवी. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामा लागले पाहिजे, अशी सूचना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्या आहेत.

पुण्यातील म्हाळुंगे ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन आज संजय राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पुणे महानगरपालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी संजय राऊत म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायती आघाडीच्या निवडणुकांमध्येही आघाडी झाली पाहिजे.

शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे. त्यामुळे आता आम्हाला आणखी काहीही नको. तुम्ही सर्वांनी एकत्र येवून मार्ग काढा आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा असे सांगून खा. राऊत म्हणाले,  महाविकास आघाडी म्हणून जिथे जिथे शक्य आहे, तिथे सत्ता स्थापन करा. आपल्या हातून काहीही सोडू नका.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version