आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : इच्छुकांची उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. संचालक मंडळासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता अनेकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायलाही सुरुवात केली आहे.

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत  उमेदवारांना निवडणूक अर्ज दाखल करता येणार आहे. ७ डिसेंबर रोजी सर्व अर्जांची छाननी होणार असून, ८  डिसेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणुकीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप २३ डिसेंबरला करण्यात येईल. या निवडणुकीसाठी २ जानेवारीला मतदान होणार असून ४ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक आहे. २०१५ मध्ये बँकेची निवडणूक झाली होती. त्यानंतर २०२० ला बँकेची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी व्यस्त असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतरही कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us