Site icon Aapli Baramati News

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; भरधाव वेगातील कारखाली चिरडला चिमुकला

ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

आजकालच्या युगात अनेक लोक आपले आयुष्य अगदी धावपळीने जगत आहेत. अनेकदा कामाच्या घाईगडबडीत लोक प्रचंड वेगाने गाडी चालवताना दिसत आहेत. याचाच फटका एका चिमूरड्याला बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपळे सौदागार येथे एका महिलेने भरधाव वेगात गाडी चालवत एका चिमूरड्याला चिरडल्याची घटना घडली आहे.

इनॉष प्रदीप कसब हा ९ वर्षांचा शाळकरी चिमूरडा चिरडला गेल्याने गंभीर जखमी झाला आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास पिंपळे सौदागरच्या साई वास्तू हाउसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.

चिमुकला इनॉष हा आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी सोसायटीतील रहिवासी असलेली सोनल देशपांडे नामक महिला रॅश ड्रायव्हिंग करत कार  अत्यंत वेगाने चालवत जात होती. यावेळी इनॉषला कारचा धक्का लागून तो खाली पडला आणि त्याच्या अंगावरून कार गेली असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींनी दिली.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे इनॉषच्या वडिलांची नोकरी गेली आहे आणि त्यात इनॉषच्या अपघातामुळे हे कुटुंब अधिकच अडचणीत आले आहे. त्यामुळे आता या चिमूरड्यावर उपचारासाठी या कुटुंबाला मोठी कसरत करावी लागणार आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version