आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंतप्रधानांनीही त्यांचा पदभार दुसऱ्याकडे द्यावा : नाना पटोले यांचा पलटवार

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू  झाले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात हजर राहू शकले नाही. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा, असे  विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांनीही त्यांच्या पदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा, असा पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतील उपस्थितीवरून प्रश्न  विचारणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आगोदर संसदेची माहिती घ्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुध्दा अधिवेशनादरम्यान अपवाद वगळला तर सभागृहात हजर नसतात. त्यांच्या मंत्रीपदाचा चार्जही दुसऱ्याकडे द्यायला हवा, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या काळात सभागृहात उपस्थित राहणार आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु विरोधक त्यांच्या उपस्थितीवर विनाकारण राजकारण करत आहेत. अधिवेशन काळात  नरेंद्र मोदी हे सुध्दा लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात उपस्थित नसतात. त्यांची महिती आगोदर भाजपाने घ्यावी. त्यानंतर त्यांनी उपस्थितीवर बोलावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे .


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us