आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतक्रीडा जगतमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ध्येयवादी निश्चयाची २२ वर्षे : राष्ट्रवादी कॉंग्रेस २२ वा वर्धापनदिन विशेष

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

ध्येयवादी निश्चयातून २२ वर्षांपूर्वी पेरलेलं सर्वसमावेशक विकासाचं बीज आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. या निश्चयाचा महामेरू असलेल्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या रूपाने आधारवडाच्या छायेत माझ्यासह अनेक कार्यकर्ते, नेते घडले आणि आजही घडत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. राष्ट्रवादाच्या विचासरणीतून सह्याद्रीसारख्या विशाल धारणेचा हा वटवृक्ष आपल्या पारंब्यानी कायम विस्तारत चाललेला आहे.

१० जून १९९९ रोजी स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज २२ वर्षांचा होत असून २३ व्या वर्षात पदापर्ण करत आहे. पक्षाचा हा २२ वा वर्धापन दिन साजरा करत असताना मागे वळून पाहिलं तर एकच व्यक्ती समोर येते ती म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब! शेतकरी, कामगार, महिला, युवा, तरुण, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार यांच्यासह शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या उन्नतीसाठी पवार साहेब झटत राहिले आणि आजही वयाच्या ८० व्या वर्षातही ते स्वस्थ बसलेले नाहीत. समाजातील सर्वच घटकांच्या उद्धारासाठी आदरणीय पवार साहेबांनी बांधलेली सर्वसमावेशक राजकारणाची वज्रमूठ कोणत्याही संकटांचा सामना निडरपणे करण्यास सक्षम असल्याचे आपण पाहतो.

पवार साहेबांनी असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फौज उभी करून त्यांच्या हाती विश्वासाने समाजविकासाचा कृतीकार्यक्रम दिला आणि या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी आपण बांधिल आहोत. पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीत्वाची संधी मिळालेले आपण सर्वजण पवार साहेबांच्या या अनमोल दूरदृष्टीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. साहेबांनी २२ वर्षांपूर्वी केवळ एक पक्ष स्थापन केला नाही तर एका विचाराची पेरणी केली. हा विचार म्हणजे सर्वांगीण राष्ट्रवाद. म्हणून तर पक्षाच्या स्थापनेपासून पाच वर्षांचा अपवाद वगळता आजवर सलग राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने पक्षाला सत्तेच्या खुर्चीत बसवले आणि त्याची गोड फळंही आज महाराष्ट्राला दिसतील, हे मी अभिमानाने सांगू शकते.

राष्ट्रवादी पक्षाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रवाद रूजवणारे पवार साहेब आज देशाचे नेते आहेत. असा नेता भारताच्या राजकीय प्रवासाला लाभला हे या देशाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांचे भाग्यच म्हणावे लागेल. कृषि क्षेत्र हा तर साहेबांचा आवडता प्रांत! मात्र कृषी क्षेत्रासोबतच संरक्षण, सहकार या क्षेत्रातही साहेबांनी आपल्या कामाची छाप उमटवली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज अनेक महिला महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत, याचे कारण म्हणजे महिला आरक्षण! हे आरक्षण साहेबांमुळे मिळाले, याचा एक महिला म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतो.

आज ग्रामपंचायतीपासून तर पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका यांच्यापासून तर राज्यातही मित्र पक्षांच्या जोडीने पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आहे. ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे कायम आखीव-रेखीव पद्धतीने मांडली जात आहेत. सामाजिक जाणिवांचा अभ्यासपूर्ण विचार करून लोककल्याणासाठी कार्यरत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज देशात विविध राज्यांमध्ये आपली पाळेमुळे घट्ट रोवताना दिसत आहे. आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याने पक्षाचे निरनिराळे विभाग कार्यरत आहेत. काळानुसार बदलणाऱ्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटीबध्द आहे. पक्षाचा आज २२ वा वर्धापनदिन जरी असला तरी, पक्षाचे कार्य कोणत्याही मर्यादेपर्यंत सिमीत नव्हते आणि यापुढेही राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एक विचार असून ती निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे आणि या प्रकियेचा एक भाग आपण आहोत याचा आज २३ व्या वर्षात पदापर्ण करताना अधिक आनंद होत आहे. पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादातून लोककल्याणाचा हा प्रवास असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर असाच निरंतर चालत राहील, यात कोणतीही शंका नाही!

माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आणि या अखंडीत प्रवासाचे नेतृत्व करणारे पवार साहेब, पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

सर्वांगीण-सर्वसमावेशक विकास हाच राष्ट्रवादाचा ध्यास…

दशकानुदशके बहरत राहील लोककल्याणाचा हा प्रवास…

  • व्हाटसअप साभार

ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us