आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक.. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला नेलं अन् पत्नीसोबत केलं ‘हे’कृत्य..!

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

मुंबई नगरीतून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला दारू पाजून मित्रांसह सामूहिक  बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महीलेने तिच्या पतीसह मित्रांविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३४, ३७६ (ड), ३७६ (२) आणि ५०६ (२) कलमांतर्गत गुन्हा दाखल करत संबंधित पती आणि त्यांच्या मित्रांना अटक केली आहे.

आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि.२६ ) आरोपी पतीने तिच्या पत्नीला मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे आहे, असे सांगून मित्राच्या घरी नेले. आरोपी पती पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेल्यानंतर तिला खूप दारू पाजली. पीडित महिला काही तासानंतर शुद्धीवर आल्यानंतर तिने तिच्या अंगावरचे कपडे अस्तव्यस्त झालेले पाहिले. याचे कारण विचारले असता याबाबत कोणाला सांगू नको. नाहीतर तुला जीवच मारून टाकले जाईल, अशी धमकी तिच्या पती आणि मित्रांनी दिली.

पीडित महिला घरी परतल्यानंतर तिचा पतीसोबत खूप वाद झाला.  घडलेला प्रकार तिने आपल्या कुटुंबीयांना कळवला. त्यानुसार संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी शनिवारी आंबोली पोलीस ठाण्यात आरोपी पती आणि मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने याप्रकरणी आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us