पिंपरी : प्रतिनिधी
भोसरीमध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षीय बहिणीवर भावाने लैंगिक अत्याचार केला आहे. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला असून या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील ऑगस्ट महिन्यात कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी हा भयानक प्रकार घडला आहे. मात्र याबाबत मुलीच्या आई वडीलांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नव्हती. गुरूवारी मुलीला त्रास झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीला आई वडिलांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर तिने भावानेच हे कृत्य केल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.