आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्र

धक्कादायक.. आईने गाठला क्रूरतेचा कळस; पैशासाठी केला स्वत:च्या मुलाचा सौदा

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

पती-पत्नीच्या वादातून कित्येकदा लहान मुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना पुण्यातील कोथरूड परिसरात घडली आहे. पैशासाठी आईनेच स्वत:च्या मुलाच्या अपहरणाचा डाव रचून विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आईसह आठ जणांना अटक केली आहे. प्रियंका गणेश पवार असे अपहरणाचा डाव रचणाऱ्या आईचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रियंका आणि तिचा पती गणेश पवार त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे ते दोघे वेगळे राहत होते. त्या दोघांना दोन मुले आहेत.

दरम्यानच्या काळात तिला पैशासाठी पैशांची गरज भासल्याने तिने चक्क एका मुलाला विकण्याचा डाव रचला होता. त्यासाठी तिने एका दाम्पत्यासोबत १ लाख ६० रुपयात आपल्या मुलाचा सौदा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पत्नीच्या कृत्याची माहिती समजल्यानंतर पती गणेश पवार याला मानसिक धक्का बसला. या क्रूरकर्मा पत्नीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी तिच्या पतीने केली आहे. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी प्रियंकासह आठजणांना अटक केली आहे.   


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us