Site icon Aapli Baramati News

दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार : चंद्रकांत पाटील यांचा इशारा

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपांचे सत्र सुरूच आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर घमासान सुरू असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यात उडी घेतली आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसमधील दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

काही दिवसापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत.  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असून इडीकडून कारवाई सुरू आहे. थोड्या दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून काही कागदपत्रे तपास यंत्रणेकडे दिले आहेत. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनीही येत्या दोन दिवसांमध्ये काँग्रेसमधील मोठ्या दोन दिग्गज नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणी मला नागालँडचा राज्यपाल म्हणतोय . तर कोणी मला पक्षात घ्यायला तयार आहे. गिरणी कामगाराच्या घरात जन्मलेला सामान्य माणूस किती प्रसिद्ध होऊ शकतो, हे तुम्ही पहात असाल.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version