
मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकर यांनी ही माहिती दिली. दिलीपकुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
वृद्धापकाळातील समस्यांमुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसात वाजता त्यांचे निधन झाल्याचं डॉ. पारकर यांनी सांगितले. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिलीप कुमार यांच्या ट्वीटर हँडलवरुन सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. त्याचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी ही माहिती दिली. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.