Site icon Aapli Baramati News

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..? राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले संकेत

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार होत्या. मात्र आता मार्चऐवजी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संकेत दिले आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद होती. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली. अगदी काही महिन्यांवर असलेल्या  परीक्षेत लिखाणाची सवय नसल्याने अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. लिखानाच्या सरावासाठी काही वेळ मिळावा अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याची यावा अशाही विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. 

विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत बच्चू कडू यांनी  शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिक्षण उपसंचालकांना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्चऐवजी एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थांना काहीसा दिलासा मिळणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version