आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

…तुमचाही नंबर येईल : संजय राऊत यांचा भाजपला इशारा

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

ज्या लोकांचा भाजपमध्ये काहीच संबंध नाही. जे मूळचे भाजपाचे नाहीत. ज्यांचा कधीच भाजपशी संबंध नव्हता. त्यांना भाजपची विचारधारा माहिती नाही असे भाजपाचे लोक धमक्या देत आहेत. तुम्ही कायद्याचे मालक आहात का? असा प्रश्न उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी तुमचाही नंबर येईल अशा शब्दात इशारा दिला आहे. 

भाजपाचे नेते महाविकास आघाडीतील पक्षातील  नेत्यांवर सतत टीका करत असतात. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेते दररोज उठून याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात टाकू म्हणत आहेत.  तुरुंग विकले गेले आहेत की तुरुंगाचे खासगीकरण केले.. तुरुंग तुमच्या बापाची आहेत काय ? या सगळ्या तुरुंगाच्या चाव्या तुमच्याकडे दिल्या आहेत काय असे अनेक प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. 

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जागेसह तुरुंगाचेसुध्दा  खासगीकरण केले आहे का.. खाजगीकरण केले असेल तर तुम्ही कायद्याचे मालक झाले आहेत काय हे स्पष्ट सांगावे. आज याचा  नंबर, उद्या त्याचा नंबर ; लक्षात ठेवा तुमचा ही नंबर येईल, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. 


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us