Site icon Aapli Baramati News

..तर समीर वानखेडे यांची चौकशी होणार : धनंजय मुंडे यांचे सूचक वक्तव्य

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून समीर वानखेडे चांगलेच आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच त्यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावरच आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबत तक्रार आल्यास वानखेडे यांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वानखेडे यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्याचवेळी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी सूचक विधान केले आहे. ज्यांना कोणाला समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप असेल तर त्यांनी सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करावी.  त्या तक्रारीनुसार सखोल चौकशी केली जाईल, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशीच करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे  

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला असून अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version