Site icon Aapli Baramati News

…तर पुण्यातील शाळा सुरू होतील; अजितदादांनी दिले संकेत

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता पुण्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मागील ८ दिवसांतील कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा सुरू करण्यात येतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शाळा महाविद्यालय आणि व्यवसायाबरोबर व्यवहाराच्या  इतर गोष्टी ठप्प झाल्या होत्या. तिसर्‍या लाटेत तसे घडले नाही. महाविकास आघाडी सरकारने तशी वेळ येऊ दिली नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. 

शाळा महाविद्यालयाचा प्रश्न या लाटेत उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. उदय सामंत यांनीदेखील राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याबाबत परवानगी दिली आहे. महापौर, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आम्ही शाळांबाबत निर्णय घेणार आहोत, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. 

मागील आठवड्यात कोरोना आढावा बैठक झाली होती. त्या बैठकीत वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version