Site icon Aapli Baramati News

…तर किरीट सोमय्या यांना जन्माचीच अद्दल घडेल : हसन मुश्रीफ यांचा इशारा

ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत काही कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिले आहेत.  माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी शिक्षा भोगेन अन्यथा; किरीट सोमय्या यांना जन्माची अद्दल घडेल, असे सांगतानाच माझी काळजी करू नकात, माझी प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे काही कारण येत नाही. सर्व कार्यकर्त्यांनी शांत राहून संयम बाळगण्याचे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.  

हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. सोमय्या जिल्ह्यात आले आले तर,  त्यांनी जाता -जाता जिल्ह्यातील भाजपाच्या भुईसपाट झालेल्या वसाहतीची माहिती घेऊन जावी. दरम्यान, ज्यावेळी तपास यंत्रणा चौकशी येतील; त्या वेळी आम्ही  त्यांना योग्य उत्तरे देत त्यांना पूर्णपणे सहकार्य करू. सोमय्या यांना आरोप करण्याची सवय लागल्याचा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

तक्रार करायची आणि तेथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची. यातून कारण नसतानाही बदनाम करण्याचा प्रकार करायचा. सोमय्या ही स्टंटबाजी कशासाठी करत आहेत ? त्यांना हा अधिकार कोणी दिला? शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार केला जात आहे. यामध्ये जर काळापैसा सिद्ध झाला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे अन्यथा सोमय्या यांना जन्माची अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

दरम्यान, माझा पक्ष आणि माझे नेते शरद पवार आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा होत असलेला गैरवापर यावर मी सातत्याने आवाज उठवत आहे. हा आवाज दाबण्याचा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा कुटिल प्रयत्न आहे परंतु हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ प्रमाणे वागावे, असा खोचक सल्ला त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 

माझ्या २० वर्षाच्या राजकारणामध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मी घेतलेल्या निर्णयावर कोठे दबक्या आवाजात टीका किंवा चर्चादेखील होत नाही. दरम्यान, मागील पाच वर्षांच्या काळामध्ये राज्यात झालेल्या, गृहनिर्माण घोटाळा, चिक्की घोटाळा , जमीन घोटाळा चंद्रकांत पाटलांचा हायब्रीड घोटाळा याची कुठलीही चर्चा होताना दिसत नाही, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version