मुंबई : प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला डॉ. विरेंद्र तावडे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुणे न्यायालयाने तावडेची जामीन अर्जाची याचिका रद्द केली. त्यानंतर त्याने ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मंगळवारी न्या. एस .एस शिंदे आणि न्या. एन. ए जमादार यांच्या खंडपीठाने तावडे याने दाखल केलेल्या याचिकेवर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचसोबत सीबीआयने अन्य तिघांवर यूपीए व हत्या इत्यादीचे आरोप लगावले आहेत. तावडे याने गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या जबाबाचा सबंध माझ्याशी लागू शकत नाही, असा दावा केला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती. याच हत्येसबंधी २०१६ पासून तावडे अटकेत आहे. दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे.