पुणे : प्रतिनिधी
आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळ्याची तपासणी करताना शिक्षक पात्रता परीक्षेतही घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केली.मात्र, आता याच प्रकरणातील एजंटवर पोलीसांनी नजर आहे.
आतापर्यंत या घोटाळ्यातील आरोपी महाराष्ट्र राज्य परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जीए टेक्नॉलॉजीचा अश्विन कुमार, शिक्षण विभाग तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, डॉ.प्रीतिश देशमुख आणि सौरभ त्रीपाठी यांना अटक केली आहे. या घोटाळ्याची सुनावणी न्यायालयात झाली.
अभिषेक सावरीकर याला ज्या एजंटने पैसे दिले त्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे एजंटच्या अडचणी वाढल्या असून या प्रकरणाला नवं वळण मिळणार आहे.या तपासात २०१८ साली जीए टेक्नॉलॉजीचा अश्विन कुमार याने अभिषेक सावरीकर याला ५ कोटी रुपये दिल्याचं समोर आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले त्यांचाही पुणे पोलीस तपास करत आहेत. एकूणच या प्रकरणाने नविन वळण घेतल्याचं पहायला मिळत असून याचा शेवट कसा होतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.