आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

‘छत्रपती’च्या कामगारांची दिवाळी यंदा धुमधडाक्यात; कारखाना व्यवस्थापनाकडून बोनस वाटप

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

भवानीनगर : प्रतिनिधी

छत्रपती सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांची दिवाळी यंदाच्या वर्षी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. नुकत्याच शुक्रवारी कामगारांना बोनस  वाटप करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी ही माहिती दिली.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कामगारांना १० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी कामगारांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. बोनसची दोन टप्प्यांत विभागणी केली असून पहिला टप्पा दिवाळीसाठी देण्यात आला आहे.  नंतरचा टप्पा मकरसंक्रांतीच्या वेळी देण्यात येणार असल्याचे प्रशांत काटे यांनी सांगितले.

कामगारांच्या बोनसपोटी तब्बल पावणे दोन कोटी रुपये कामगारांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या १८० कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात आले आहे. तसेच ६२ कामगारांनाही कामावर घेण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us