Site icon Aapli Baramati News

चित्रपटसृष्टीला डिस्को आणि पॉप संगीताची ओळख करून देणार्‍या बप्पी लहरी यांचे निधन

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधीचित्रपटसृष्टीला डिस्को आणि पॉप संगीताची ओळख करून देणारे  ‘गोल्डनमॅन बप्पी लहरी’ यांचे आज सकाळी निधन झालं आहे. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
जवळपास पाच दशके आपल्या संगीताने आणि आवाजाने त्यांनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं होतं. १९७३ साली ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परंतु त्यांना १९८२ साली प्रदर्शित झालेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे त्यांना यश मिळाले. त्यांनी ‘डिस्को डान्सर, तम्मा तम्मा लोगे,  याद आ रहा है तेरा प्यार’  यासारखी अनेक अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले आहे.
२०२१ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मात देखील केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version