
मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (३ जून) सकाळी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन संवाद साधला. यावेळी अजितदादांनी संचालक मंडळाचे अभिनंदन करत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
आज सकाळी ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक मंडळ सदस्य डॉक्टर सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील, किशन चौगुले, नंदकुमार ढेंगे आदी मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाची तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. त्यावर उपाययोजना राबावण्याबरोबरच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले.