Site icon Aapli Baramati News

‘गेंड्याच्या कातडीचे सरकार’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर नीलम गोऱ्हेंचा पलटवार

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  आघाडी सरकारवर ‘गेंड्याच्या कातडीचे सरकार’ या शब्दात टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑन फिल्ड आहेत. विरोधकांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, त्याला आम्ही काय करावे. ठाकरे सरकार हे जनतेच्या मनात आहेत. चंद्रकांत दादांना एखादं उपमांचं पुस्तक आणून द्यावं, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे शहरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेत विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. शाळा पुन्हा चालू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यासाठी कोणताही दबाव आणू नये. नाईलाजानं सरकारने बंद केल्या आहेत, असेही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version