Site icon Aapli Baramati News

खडकवासला मतदारसंघातील तब्बल ३२ हजार १२४ मतदारांची नावे रद्द होणार

ह्याचा प्रसार करा

खडकवासला : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभेच्या मतदार संघातील मतदार याद्यांची शुद्धीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत खडकवासला मतदारसंघातील तब्बल ३२ हजार १२४ मतदारांची नावे रद्द होणार आहेत, अशी माहिती नोंदणी अधिकारी तथा हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले आणि हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली आहे.

मतदारयाद्या शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत खडकवासला मतदारसंघाच्या  यादीचे शुद्धीकरण कार्यक्रम चालू आहे. रद्द होणार असणाऱ्या ३२  हजार १२४ मतदारांचे छायाचित्र नाही. त्याचसोबत १ हजार ३०९ मतदारांचे यादीमध्ये दोनदा नावे आहेत. त्यामुळे हे सर्व नावे रद्द करण्यात येणार आहेत. ज्या मतदारांचे छायाचित्र नाहीत त्यांच्याशी त्यांच्या घरी संपर्क साधून शहानिशा केली जात आहे.

रद्द करण्यात आलेल्या सर्व मतदारांना आणि ज्यांच्या पत्ता नाव, छायाचित्र, जन्मतारीख वय, मतदारसंघ बदलले, तत्सम दुरुस्ती करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  नवीन प्रारुप मतदार यादी १ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचसोबत नवीन मतदार नोंदणी चालू आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version