मुंबई : प्रतिनिधी
नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानाची मुंबई महापालिकेने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील निवासस्थान अनधिकृत नसल्याचे म्हटले होते. अशातच पुन्हा त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला येथील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश केंद्राने दिले आहेत.
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या नागपूर कार्यालयाने पोस्टल जीवन प्राधिकरणाला नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेने मुंबईतील जुहू ‘आदिश’ येथील बंगल्याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर; आता केंद्रानेही सिंधुदुर्ग मधील मालवण चिवला येथील नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये नारायण राणे यांनी निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड-२ चे उल्लंघन केली असल्याची तक्रार केली होती. यानंतर केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने पोस्टल जीवन प्राधिकरणाला बंगल्याची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.