Site icon Aapli Baramati News

काँग्रेसला दूर ठेऊन तिसरी आघाडी होऊ शकत नाही : संजय राऊत

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यटन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी राज्यातील एकाही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही. त्यातच यूपीएचे अस्तित्वच उरले नसल्याचे सांगत कॉँग्रेसलाही लक्ष्य केले होते. यावर आता संजय राऊत यांनी काँग्रेसला दूर ठेवत आघाडी होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून भाष्य केले. ममता बॅनर्जी या देशातील मोठ्या नेत्या  असून भाजपा विरोधातील लढाईतील त्या मोठ्या योद्धा आहेत. त्यांचा लढा प्रेरणादायी आहे. यूपीए कोठे आहे? त्यांचा हा प्रश्नही योग्य आहे. यूपीए मजबूत झाल्याशिवाय २०२४ ची लोकसभा निवडणूक कशी लढणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे. तिसरी आघाडी निर्माण झाली, तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे तिसरी आघाडी उभी करून फायदा काय होणार ? याबाबत विचार करायला हवा असेही त्यांनी सांगितले.

 काँग्रेसला दूर ठेऊन तिसरी आघाडी करणे शक्य नाही. सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचा बेस आहे. त्यांना दूर ठेवता येणार नाही.  काँग्रेसला दूर ठेवले तर मतांचे विभाजन होईल. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही आक्षेप नोंदवू शकत नाही.  भाजपाला रोखले पाहिजे असे पवार साहेबांचे म्हणणे आहे. यामुळे आम्ही ममता दीदी सोबत यासंदर्भात पुन्हा चर्चा करून काँग्रेसला सोबत घेऊन पुढे जायचे असा  विचार ठेवला आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असेही मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version