Site icon Aapli Baramati News

करदात्यांना दिलासा : ITR भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) ने त्या करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्यांनी अद्याप आयकर विवरणपत्र भरले नाही. त्यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आधी ३० सप्टेंबरपर्यंत होती. मात्र आता त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै पूर्वी होती. ती आधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.

जेव्हा करदात्यांना नवीन आयटीआर पोर्टलवर आयटीआर दाखल करण्यात अडचण येत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी इन्फोसिसला 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version