Site icon Aapli Baramati News

एका पाठ्यपुस्तकात चार विषय; विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमातील चार विषय एकाच पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच  २०२२- २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकाचे ओझे कमी होणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही पद्धत सुरुवातीला पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी वापरली जाणार आहे. त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी ही पद्धत लागू होईल. नवीन निर्णयानुसार  इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिका असे इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत.

सध्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे ६ वर्षांचा आहे, त्याच्या बॅगेत किमान ८३० ग्रॅम इतके पाठ्यपुस्तकांचे वजन असते. यामध्ये पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे वजन जोडल्यास बॅगेचे वजन १ किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन २१० ग्रॅमपर्यंत कमी होते.

प्रायोगिक तत्त्वावर, ४७७ मॉडेल स्कूलमध्ये पुस्तके सादर करण्यात आली आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग १, २, ३ किंवा ४ असे फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version